
The fundamental question ‘Who am I?’, at some stage in our lives, often arises for one reason or another. But on the contrary – we are busy studying all other external objects except ourselves and fail to study our ‘self’. If man knows his true nature, the life of himself as well as all other beings can become more beautiful and happy.
Due to the misunderstanding that “we are what we are not”, even after progressing on material levels, we often find ourselves unhappy, miserable, and hopeless. So “Who am I?” In understanding this, the negotiator must first understand “who I am not.” Means “neti neti neti” meaning “It’s not me! It’s not me!” In doing so, what remains in the end is “That’s me!” This can be confirmed.
Kōhaṃ? Who Am I?’ Let’s understand it in simple words and with mindmap..
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल.
“आपण जे नाही आहोत ते आपण आहोत” असा गैरसमज करून घेतल्यामुळे, भौतिक पातळींवर प्रगती करून देखील, अनेकदा आपण स्वतःला दुःखी, कष्टी, आणि हताश समजत असतो. म्हणून “मी कोण आहे?” हे समजून घेताना, निषेदार्थाने “मी कोण नाही” हे आधी समजून घेतले पाहिजे. म्हणजे “नेति नेति नेति” अर्थात “हे मी नाही! ते मी नाही!” असे करता करता, सरतेशेवटी जे शिल्लक राहील “ते मी आहे!” याची निश्चिती होऊ शकेल.
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ समजून घेऊयात – सोप्या शब्दांत, नकाशांसह …